वार्ताहर / कुदनूर
कागणी येथील शेतकरी बाबासो सर्जेराव देसाई (वय ७२) यांचा शेतातील बांधावरून पडून मृत्यू झाला. बाबासो हे बुधवार दि. १६ रोजी कालकुंद्रीकडील ताबांळ नावाच्या शेतातील उसाला पाणी पाजविण्यासाठी आपल्या मुलासह गेले होते. उसाला पाणी पाजवत असताना ते बाधांवरून पाय घसरून पडले. त्यात त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी कोवाड येथे दाखल करण्यात आले.
त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथे रवाना करण्यात आले. बेळगाव येथे उपचार सुरू असतानाच रविवार दि. २० रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुली असा परिवार आहे.