प्रतिनिधी / कागल
कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक दोन आणि तीन यांचे प्रशिक्षण कागल शहराजवळील पूणे बेंगलोर महामार्गावर प्रशासकीय भवन येथे सुरू झाले.
नवीन चेक पोस्ट आरटीओ गोदाम परिसरात दिनांक 2 जानेवारी व 9 जानेवारी सकाळी 9 ते 12 व दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते सायंकाळी 5 या कालावधीत प्रशिक्षण होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आणि निवडणूक पूर्वतयारी सुरू आहे.
प्रशासनाच्यावतीने विशेष निवडणूक अधिकारी कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आणि प्रशिक्षणार्थी केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्यामध्ये सभागृहात बसून प्रशिक्षण प्रक्रियेची पाहणी केली.