प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी अबकारी खात्याच्या वतीने संतीबस्तवाड गावाजवळ वाहनाची तपासणी करताना दुचाकीवरून काजु फेणीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱया दोघा जणांना अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी अटक केली आहे. भाऊ सुभाष सोनार आणि प्रविण परशुराम पाटील यांना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जवळून 10 लिटर काजू फेणी आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
अबकारी खात्याचे सह आयुक्त आणि उपआयुक्त बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आर. एम. नदाफ यांनी कारवाई केली आहे.