साहित्य : 4 मोठे कांदे, 7 ते 8 लसूण पाकळय़ा, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 वाटी काजू, 2 चमचे तेल, पाव वाटी मावा, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार पांढरी मिरपूड, आवश्यकतेनुसार दही आणि क्रीम
कृती : प्रथम कांद्याच्या फोडी करून पाण्यात शिजवून घ्याव्यात. नंतर त्यात लसूण पाकळय़ा, किसलेला आल्याचा तुकडा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला लावून पेस्ट बनवावी. काजू गरम पाण्यात अर्धा तास भिजवून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात कांद्याची पेस्ट टाकून हलके परतवून घ्यावी. मात्र याचा रंग बदलता कामा नये. रंग पांढराच राहायला हवा. नंतर त्यात काजू पेस्ट घालून पुन्हा मिश्रण हलके परतवून घ्यावे. नंतर त्यात मावा कुस्करून घालावा व थोडे परतवून आच बंद करावी. शेवटी मीठ व मिरपूड घालून मिश्रण मिक्स करावे. तयार पांढरी ग्रेव्ही कोणतेही पनीर अथवा मसालेदार पदार्थ तयार करताना वापरता येऊ शकते. पदार्थ बनविल्यानंतर वरुन दही व क्रीम घालून खाण्यास द्यावे.