प्रतिनिधी / पणजी
गोव्याच्या काजू फेणीचा जगभर प्रसार व्हावा, यासाठी राज्य सरकारतर्फे 2016पासूनच प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर टपाल खात्यातर्फे काजू फेणीवर विशेष कव्हर प्रकाशित केले. सदर प्रकाशन पोस्टमास्टर जनरल गोवा प्रदेशचे कर्नल एस.एस.एच. रिझवी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ सुप्रीटेडेंट गोवा प्रदेश डॉ. सुधीर जखेरे, गोवा फिलाटेलिक आणि न्युमीस्मेटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. रमेश कुमार, सोसायटीचे सचिव अश्लेष कामत उपस्थित होते. काजू फेणीवरील विशेष कव्हर आणि गोवापेक्स 2021चे बुलेटिन फिलाटेलिक ब्युरो पणजी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यावेळी गोवापेक्स 2021च्या बुलेटिन1च्या प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. जिल्हास्तरीय व्हर्च्युअल फिलाटेलिक प्रदर्शन 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. आझादी हा अमृत महोत्सव ही या प्रदर्शनाची थीम असून 75वर्षातील ऐतिहासिक क्षण, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर गोवापेक्स 2021 प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शनात भारतीय संस्कृती आणि वारसा प्रदर्शित करण्यात येणार आहे. याशिवाय गोमंतकीयांसाठी विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.