प्रतिनिधी / म्हापसा
वेर्ला सातेरी नगर येथे कोविड 19 चा रुग्ण आढळून आल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावात कुणीही नाहक बाहेर फिरू नये अशी माहिती येथील संघटनेने दिली आहे. दरम्यान म्हापसा अग्निशमन दलाच्या अधिकारी वर्गांनी वेर्ला वॉर्ड क्र. 5 सातेरीनगर येथे जाऊन ज्या ठिकाणी हा रुग्ण आढळून आला आहे त्या जागेची पाहणी करून त्या ठिकाणी पूर्णतः सेनिटायझेशन करून औषधाचे फवारे मारले.
नागरिकांच्या सेवेस आम्ही सदैव तत्पर– बॉस्को फेर्राव
दरम्यान म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव म्हणाले की, आठ दिवसापूर्वी काणका डिमेलवाडा सासू सुनेला पॉझिटिव्ह मिळाले असता स्थानिक पंचानी आम्हाला घरात व दुकानात सेनिटायझेशन करायला लावले होते. मात्र ते औषधाचे फवारे घरात वा दुकानात मारण्यास घरातील कुटुंबियांना त्याची इजा होऊ शकते त्यामुळे आम्ही घरात मारीत नाही. त्यांच्या घराच्या भओवताल परिसरात मारून आम्ही येतो असे अधिकारी फेर्राव यांनी स्पष्ट केले. आजरी सातेरीनगर मध्ये पूर्णतः सेनिटायझेशन केले असल्याची माहिती श्री. फेर्राव यांनी दिली. काणकाचे पंच लिंगुडकर यांनी अग्निशमन दलाच्या जवानावर केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. आम्ही नागरिकांच्या सेवेस सदैव तत्पर असतो असे ते म्हणाले.
म्हापसा अग्निशमन दालाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन धावस्कर, प्रिमो डायस, परेश मांद्रेकर यांनी औषधाची फवारणी मारून सातेरी नगर भोवताल परिसरात सेनियाटझेशन केले.