प्रतिनिधी /काणकोण
मूळ चक्रा, मावेली-केरळ येथील आणि सध्या श्रीस्थळ येथील भाटपाल गृहनिर्माण वसाहतीजवळच्या नवीन वाडय़ावर स्थायिक झालेल्या राजीव विजयन या व्यक्तीकडून 92 ग्रॅम गांजा काणकोणच्या पोलिसांनी जप्त केला आहे. सदर संशयित व्यक्ती काणकोणात प्लंबरचे काम करत होती. काणकोणच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो यांनी हा छापा मारला. संशयिताला अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या गांजाची किंमत 92100 रु. इतकी आहे. निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वदेश देसाई पुढील तपास करत आहेत.