प्रतिनिधी /काणकोण
काणकोण कोमुनिदादीच्या अध्यक्षपदी किसन ना. गावकर यांची निवड झाली आहे, तर मुखत्यारपदी शांबा ना. देसाई निवडून आले आहेत. कोमुनिदादीच्या एकूण 430 पैकी 333 सदस्यांनी मतदान केले. त्यातील किसन ना. गावकर यांना 173 मते मिळाली, तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी अनिल भगत यांना 122 मते मिळाली.
या निवडणुकीत संतोष ना. देसाई हे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. मुखत्यारपदी निवडून आलेल्या शांबा देसाई यांना 145, तर बरसात ना. गावकर यांना 87 आणि संजय ना. देसाई यांना 80 मते मिळाली. उपमुखत्यारपदी किरण ना. गावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. खजिनदारपदी 137 मते घेऊन नारायण ना. गावकर हे निवडून आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रशांत ना. गावकर यांना 133 मते मिळाली. उपखजिनदारपदी सुरेंद्र ना. देसाई हे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या निरीक्षक म्हणून गायत्री ना. देसाई यांनी मामलेदार मनोज कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले .