प्रतिनिधी / काणकोण
काणकोण पालिकेच्या किंदळे प्रभागातील इतर मागास वर्गियासाठी राखीव असलेल्या वार्डातून अमिता चंद्रहास पागी आणि माया दिनेश पागी या दोन उमेदवारांनी काल 1 मार्च रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यानी हे अर्ज स्वीकारले. यावेळी माजी नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, प्रार्थना ना. गावकर आणि अन्य समर्थक उपस्थित होते.
दरम्यान, या पालिकेच्या सावंतवाडा वार्ड आणि देवाबाग वार्डातून निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांनी कडक मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली असून माजी नगराध्यक्ष अजय भगत आणि सेंत्रु प्रोमोतर द इस्त्रgसांव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई यांनी युती करून या निवडणुकीत अनुक्रमे सारा उर्फ साबिता देसाई आणि सानिजा भिकर देसाई या उदेवारांना पुढे केले आहे आणि आपला पाठिंबा दिला आहे. सावंतवाडा वार्डातून मावळत्या नगराध्यक्षा नीतू समीर देसाई तर देवाबाग वार्डातून शर्मिला दिनकर देसाई निवडणुकीत उतरणार आहेत. चावडी वार्डातून माजी नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर आणि हेमंत ग्रासियस तर नगर्से वार्डातून रंगनाथ गावकर आणि हेमंत गावकर, मास्तीमळ वार्डातील संभाव्य उमेदवार आज 2 रोजी आपला उमेदवारी दाखल करणार आहेत.