पेडणे / प्रतिनिधी
जनता लाॕकडाऊनमुळे हैरण झाली असतानाच मे महिन्यात आता लोकांना पाण्याची समस्याही मोठय़ा प्रमाणात भेडसावत आहे. मांदे मतदारसंघातील कातुर्ली सोणये भागात तुये पंचायत क्षेत्रातील नागरिक गेले दोन महिने नळाला पाणी येत नसल्याने गेले अनेक दिवस नळाच्या पाण्याची समस्या सतावत होती . अखेर मांदे मतदारसंघाचे आमदार दायानंद सोपटे यांनी सोणये , कातुर्ले येथे पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंत्ये श्री .वाल्सन व कनि÷ अभियंत्ये श्री .शिरोडकर यांच्या सोबत या भागाची पाहणी करुन ग्रामस्थां®ााr चर्चा करुन त्यांची समस्या ऐकून कातुर्ली , सोणये या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना दिले.
यावेळी दयानंद सोपटे यांच्या सोबत तुयेचे सरपंच सुहास नाईक, माजी पंचसदस्य उदय मांदेकर, भागातील ग्रामस्थ शंबा पुनाजी, पुंडलीक साळगावकर , रितेश मांदेकर, संतोष नार्वेकर, श्रीपाद कांबळी, एल्सी डिसोझा, मोहिनी नाईक, रंजना पुनाजी आदी उपस्थित होते.
जेवढा लाॕकडाऊन मुळे ञास झाला नाही तेवढा पाण्यासाठी झालाः उदय मांदेकर
उदय मांदेकर यांनी सांगितले की गेले अनेक दिवस कातुर्ली सोणये येथे दोन महिन्यापासून नळाला पाणी येत नव्हते ही गंभीर समस्या होती .आठवडय़ात एक दोनच वेळा पाणी येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी खूप ञास सहन करावे लागले. जेवढे ञास लाॕकडाऊनमुळे झाले नाही तेवढे ञास आम्हाला पाण्या अभावी झाले. मांदे मतादारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी आज सोणये कातुर्ली वाडय़ावर येऊन पाणी समस्या ऐकून घेऊन या भागात अभियंत्याना सुरळीत पाणी सुरु करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आमदार दयानंद सोपटे यांचे आभार मानले.