कळंबा/प्रतिनिधी
नवदुर्गापैकी एक असलेल्या कळंब्याजवळील कात्यायनी मंदिरात गुरुवारी पहिल्या दिवशी देवीची आकर्षक उत्सवमूर्तीची खडी स्वरूपातील पूजा बांधण्यात आली आहे. कोरोनामुळे गतवर्षी नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा झाला होता.या ही वर्षी मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त पाच मानकऱ्याच्या उपस्थितीत विविध धार्मिक उपक्रम सुरू आहेत. जागृत देवस्थान असलेल्या कात्यायनीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्तांची गर्दी असते. पहिल्याच दिवशी देवीची उत्सवमूर्तीची खडी स्वरूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रूपात देवीची पूजा बांधण्यात येणार आहे. कात्यायनीदेवीची पूजा पूजक वैभव गुरव, ऋषिकेश गुरव यांनी बांधली होती.