पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते. पण आता यात एक ट्विस्ट आलंय आणि हे ट्विस्ट आणलंय नचिकेतच्या ऑस्ट्रेलियामधून आलेल्या खास मैत्रिणीचं. कादंबरी म्हणजेच पॅडी नचिकेतच्या घरात येते आणि त्यानंतर अनेक गोष्टी बदलताना दिसतात.
मालिकेमध्ये या हॅपी गो लकी पॅडी म्हणजेच कादंबरीची भूमिका साकारतेय अभिनेत्री पूजा बिरारी. यापूर्वी साजणा या मालिकेमध्ये रमाची भुमिका यशस्वीपणे साकारणाऱया पूजाची अभिनेत्री म्हणून ही दुसरी मालिका आहे. या भुमिकेबद्दल बोलताना पूजा खुप उत्साही दिसते, ती म्हणाली, या र्प्वी प्रेक्षकांनी मला अत्यंत साध्या सरळ रमाची भुमिका साकारताना पाहिलं. आणि आता ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये मी रमाच्या एकदम विरुद्ध अशी कांदबरी साकारतेय. मालिकेमध्ये माझ्या व्यक्तिरेखेचा नुकताच प्रवेश झालाय. त्यामुळे मी खुपच उत्साही आहे. माझ्यासाठी रमा काय किंवा कादंबरी काय दोनही भुमिका मनाच्या खुप जवळ आहेत. पूजा पूढे सांगते की, पॅडी ही आजची आधुनिक विचारांची मुलगी आहे ती खुप अल्लड आहे मस्तीखोर आहे बिनधास्त आहे पॅडी साकारण्यापूर्वी मी याप्रकारच्या आधी साकारल्या गेलेल्या काही भूमिकांचा अभ्यास केला. माझ्यासाठी ही भुमिका एक मोठं आव्हान आहे यात माझ्या अभिनयाचा कस लागतोय हे महत्वाचं. असे ती म्हणाली.
सध्या लॉकडाऊनमुळं काही महिने बंद झालेली शुटिंग्ज आता सुरु झालीयेत यावातावरणात शुट करतानाचा अनुभव पूजा शेअर करताना सांगते की, माझी आधीची मालिका संपली आणि लगेच लॉकडाऊन सुरु झालं, त्यामुळे मी शुटिंग खुप मिस करत होते पण नशिबाने काही महिन्यातच मला ही नवी मालिका मिळाली आता लॉकडाऊन हळूहळू कमी होताना आमच्या शुटिंगलाही जोरदार सुरुवात झालीये. पॅडीची व्यक्तिरेखा मला खुप आवडली या व्यक्तिरेखेला खुप सार्या शेडस् आहेत त्यामुळे ऐकताक्षणी लगेचच मी होकार दिला. शिवाय मी मालिकेतल्या माझ्या सहकलाकारांना आधीपासूनच ओळखत होते त्यामुळे मला सेटवर रुळायलाही फार वेळ लागला नाही. आम्ही सगळेच शुटिंगदरम्यान खूप धमाल करतो. मित्रमैत्रिणींसोबत काम करताना आपलं काम अधिकच खुलतं असा माझा अनुभव आहे पॅडीला प्रेक्षकांकडून जो सकारात्मक प्रतिसाद मिळतोय यातून हेच सिद्ध होतंय, अशी प्रांजळी कबूलीही पूजाने यावेळी दिली.
पॅडी, नचिकेत आणि सई यांचा हा प्रेमाचा त्रिकोण आणि त्यात अप्पा यांच्या कटू कटाक्षाचे तीर यामुळे ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेची रंगत वाढू लागलीये. त्यात आता पॅडीची व्यक्तिरेखा अजून काय नवे रंग भरतेय आणि त्यातनं मालिकेमध्ये कोण कोणते ट्विस्ट येणार हे यापुढे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.