नियम मोडत ग्राहकांना दुकानात दिला जातोय प्रवेश
प्रतिनिधी/ सातारा
कापड विक्रेत्यांना दुकाने सूरू करण्याची परवानगी मिळाली असून ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करत आहेत. मात्र सोशल डिस्टंन्सच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार साताऱयातील प्रसिद्ध कापड विक्रेते म्हसवडकर ड्रेसेस मध्ये घडत आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्याने सगळयात जास्त फायदा कापड विक्रेत्यांना झाला आहे. तब्बल 60 दिवसांनी दुकाने सूरू करण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे खरेदीला बेक लागला होता. दरम्यान, अटी-शर्तीवर शहरातील सर्वच दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. सकाळपासून खरेदीला तुफान गर्दी होत आहे. या गर्दीत प्रशासनाकडून घालून दिलेल्या सर्व नियमांची पायमल्ली होत आहे. असा प्रकार साताऱयातील प्रसिद्ध कापड विक्रेते म्हसवडकर ड्रेसेस मध्ये शनिवारी घडला. खरेदीसाठी दुकानातील एकाच बाजुच्या शर्टर उघडून ग्राहकांना प्रवेश दिला जात होता. यामुळे मोठया संख्येने ग्राहकांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील कामगाराची संख्याही जास्त आहे. यात आणखी भर पडत ग्राहकांची संख्या वाढली. यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडला होता. नियमाप्रमाणे फक्त 5 ग्राहक एक वेळी घेता येतील असे असताना आत एका वेळी 25 ते 30 ग्राहक व 20 सेल्समन अशी 50 ते 60 लोक होती. अशा या गर्दीत कोरोना पसरल्यास संबंधित दुकान मालक जबाबदारी घेणार का, किंवा या अशा या दुकानदारांना प्रशासन जाब विचारणार का ,की कारवाई करणार हे आता पाहावे लागेल संबंधित क्षेत्र हे शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मोडत असून शाहूपुरी पोलीसांची कारवाईकडे सगळयांचे लक्ष वेधले आहे.