ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेतल्यापासून तालिबानची दहशत वाढत आहे. आज सकाळी काबूलमधील राष्ट्रपती भवनाजवळ तीन ठिकाणी रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यातून राष्ट्रपती अशरफ गनी यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, बकरीच्या नमाजसाठी कबूल मधील एका मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमले होते. राष्ट्रपती अशरफ गनीही या नमाजमध्ये सहभागी होत असताना सकाळी 8 च्या सुमारास राष्ट्रपती भवनाजवळील बाग-ए-अली मर्दन, चामन-ए-होजोरी आणि मानबे बशरी भागात तीन रॉकेट हल्ले करण्यात आले.