ऑनलाईन टीम / काबुल :
इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेकडून काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेकने वर्तवली आहे. यासंदर्भात अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी नागरिक देशाबाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी करत आहेत. या विमानतळावर अमेरिकन सैन्याचे नियंत्रण आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने काबुल विमानतळाबाहेरील गेटवर गर्दी न करण्याचे निर्देश अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले आहेत. तसेच अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना काबुल विमानतळावर येण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. दरम्यान, या विमानतळाच्या सुरक्षेसाठी विमानतळाच्या चारही बाजूला वॉच टॉवर तयार करण्यात आले आहेत.