अदनीचा व्यवसायाची वाटचाल अडचणीमधून : खाद्यतेलाचे उत्पादन घटले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फॉर्च्यून ब्रँडसोबत खाद्यतेलाची विक्री करणारी कंपनी, अदानी विल्मरने यांचा व्यवसाय लॉकडाऊनच्या निर्णयामुळे अडचणीत आला आहे. यात प्रमुख कारण आहे, ते कर्मचाऱयांची कमी असल्यामुळे खाद्यतेलाच्या उत्पादनात जवळपास 40 टक्क्मयांनी घसरण आली आहे. सोबत याचा प्रभाव आवश्यक वस्तूच्या बाजारांवरही पडला असल्याचे दिसून आले आहे.
कोविड 19च्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याचा हॉटेल, रेस्टॉरेंट आणि त्यांच्याशी संबंधीत असणाऱया व्यवसाय मोडकळीस आले आहेत. अशी माहिती कंपनीचे उपसीईओ आंग्शु मल्लिक यांनी दिली आहे. याच्या प्रभावामुळे खाद्यतेलाची विक्री 25 टक्क्मयांनी घसरण झाली आहे.
बंद स्वरुपात तयार करण्यात येणाऱया खाद्यतेलामध्ये अदानी विल्मर जवळ सर्वाधिक 20 टक्क्मयांची बाजारामधील हिस्सेदारी असल्याचे सांगितले आहे. जास्तित जास्त मजूर आपल्या आपल्या गावी गेले असल्यामुळे स्थानिक मजूर मात्र आरोग्य जपण्यासाठी काम करण्यासाठी तयार होत नाहीत. मल्लिक यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिदिन जवळपास 8 हजार टन खाद्यतेलावर प्रक्रिया व उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती आहे. परंतु कामगारांची संख्या मर्यादीत असल्यामुळे उत्पादनात मात्र 40 टक्क्मयांनी घट नोंदवण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात अन्य ठिकाणी राहणाऱया कामगारांनी कोरोनाच्या धास्तीने घरी जाणेच पसंत केले आहे. त्यामुळे कोणीही कामगारा जिवाच्या भीतीने काम करण्यासाठी येत नाहीत.
विविध ठिकाणचे प्रकल्प
देशातील विविध राज्यांमध्ये कंपनीचे जवळपास 25 तेल प्रक्रिया करण्याचे प्रकल्प आहेत. कंपनी ट्रकांच्या माध्यमातून खाद्यतेलाची वाहतूक करत आहे. कारण रेल्वेमधून तेलाची वाहतूक करताना अधिककांच्या कामगारांची संख्या लागते. याच कारणास्तव मागणीतही जवळपास 25 टक्क्मयांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.
फॉर्च्यूनची अन्य उत्पादने
फॉर्च्यून ब्रँडची अन्य उत्पादनातही मोठा प्रभाव निर्माण झाला आहे. यात खाद्यपदार्थांचा समावेश असल्याचेही सांगितले आहे. ब्रँडेड गव्हाचा आटाण् तुकडा बासमती, डाळी, बेसन आदी उत्पादनाच्या उत्पादनावर प्रभाव झाला आहे. तर दुसऱया बाजूला सोयाबीनच्या विक्रीत मात्र मोठी तेजी आली आहे.