साताऱयातील घटना – एकास अटक
प्रतिनिधी/ सातारा
एका कामगारास कामास ठेवल्याच्या रागातून साताऱयातील पाचजणांनी करंजे येथे भैरवनाथ मंदिराजवळ भाडय़ाने खोली घेवून रहात असलेल्या परप्रांतिय गंवडय़ाच्या घरात घुसून तोडफोड करत त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राजेश स्वामीनाथ गौड याला अटक करण्यात आली आहे. इतर संशयित फरारी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार रामकुमार रामाशंकर पटेल (वय 32, सध्या रा. करंजेपेठ, भैरवनाथ मंदिर, मूळ रा. बिहार) याच्याकडे सुभाष शहा नावाचा कामगार काम करत आहे. तो पूर्वी राजेश स्वामीनाथ गौड याच्याकडे काम करत होता. त्याला कामावर ठेवल्याचा राग मनात धरुन राजेश गौड रा. करंजे, महेंद्र परवे (रा. शिवाजीनगर, शाहूपुरी), त्याचा भाऊ दिव्या परवे, महेंद्र परवेचा मित्र मोहन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हे चौघेजण दि. 2 रोजी करंजे येथे आले.
या सर्वांनी रामकुमार रहात असलेल्या भाडय़ाच्या खोली गर्दी जमवून घरातील टीव्ही, लाईट व संसारपोयी साहित्याची तोडफोड केली. तसेच लाकडी दांडक्याने रामकुमार यास बेदम मारहाण केली. यावेळी रामकुमार याच्या पत्नीस मारहाण करताना झटपटीत तिचा ब्लाऊज फाडून तिचा विनयभंग केला. तिचे मंगळसुत्रही गहाळ झाले असून संशयितांनी रामकुमार याच्या मेव्हणीसह मुलांना देखील मारहाण करुन तेथून पळून गेले.
दरम्यान हा प्रकार घडत असताना मोठय़ाने आरडाओरडा ऐकून परिसरात खळबळ उडाली होती. संशयित आरोपी पळून गेल्यानंतर उपचार घेवून रामकुमार याने दि. 3 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.