प्रतिनिधी / कराड
येथील माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या निवासस्थानी राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हय़ाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटी दरम्यान नामदार खाडे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नगरपरिषदेच्या कामगारांच्या विविध समस्यावर चर्चा झाली. नगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदा खवळे यांनी कामगारासंबंधी समस्या मांडल्या. कर्मचाऱयांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत रोहिणी शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंदे यांनी आग्रही मागणी केली. विषयाचे गांर्भीय लक्षात घेऊन त्वरित संबंधित लेबर कमिशनरना संपर्क करून पुढील कार्यवाहीचे आदेश खाडे यांनी दिले. तसेच पाल खंडोबा येथील विविध विकास कामांची माहिती सुरेश तात्या पाटील, विश्वासराव पाटील आणि गणेश इंजेकर यांनी दिली.
यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंबीय, उमेश शिंदे मित्र परिवार, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, संजय पवार, सागर शिवदास, सदाशिव साळुंखे, भूषण जगताप, महेश महादर, अनिकेत पत्की, रोहन विभुते, अविनाश शिंदे, दिलीप पाटील, सुरेश खिलारे, दस्तगीर शेख, आकाश कांबळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदा खवळे, सुनीता आठवले व जयभारत ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.