प्रतिनिधी /पणजी
केंस आणि कांतीच्या सौंदर्याशी संबंधित दर्जेदार आयुर्वेदिक उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या कामा आयुर्वेद कंपनीतर्फे गोव्यातील पहिल्या स्टोअरचे उद्घाटन शुक्रवारी पणजीत करण्यात आले.
लक्झरी आयुर्वेदिक ब्युटी ऍण्ड वेलनेससाठी भारतातील आघाडीचा ब्रँड असलेल्या कामा आयुर्वेदने आपल्या ग्राहकांच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे, असे उद्घाटनप्रसंगी बोलताना कंपनीचे सहसंस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक साहनी यांनी सांगितले.
पणजीत आझाद मैदानाशेजारी मध्यवर्ती ठिकाणी हा स्टोअर सुरू करण्यात आला आहे. तेथे कामा आयुर्वेदने आयुर्वेद आणि आधुनिकता यांचा मेळ साधत निर्मिती केलेल्या उत्पादनांची श्रृंखला सादर करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने हेअरकेअर, बॉडी केअर, वेलनेस यांचा समावेश आहे.
पुढे बोलताना साहनी यांनी लवकरच गोव्यात आणखी दोन स्टोअर्स सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. हे स्टोअर अनुक्रमे दाबोळी आणि मोप विमानतळांवर स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून गोव्यातील ग्राहकांना कुमकुमादी स्किनकेअर रेंज, ब्रिंगादी इंटेंसिव्ह स्किनकेअर रेंज, प्युअर रोझ वॉटर, स्किन ब्राईटनिंग ट्रिटमेंट आदी आयुर्वेदिक तत्वांवर आधारित उत्पादने उपलब्ध होणार आहेत.