बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री काम्या पंजाबी मनापासून आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. काम्या पंजाबीचा मोठा चाहता वर्ग आहे, तरीही सोशल मीडियावर काही वेळा तिला मोठय़ा प्रमाणात ट्रोल केलं जातं. अलीकडेच काम्याने या ट्रोलिंगला त्याच भाषेत उत्तर दिले. सेलिब्रिटी चॅट शो मध्ये अभिनेत्री निया शर्मा बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंगबद्दल बोलत होती.
काम्याने सुद्धा या विषयावर मोकळेपणाने तिची मतं मांडली. ट्रोलिंगचे तिने काही व्यक्तीगत अनुभव सांगितले. पहिलं लग्न मोडल्यानंतर काम्या दुसऱयांदा कोणाच्यातरी प्रेमात पडली. त्या रिलेशनशिपवरुन तिला ट्रोल करण्यात आलं. तो अनुभव सांगताना काम्या पंजाबी भावनिक झाली होती. माझं पहिलं लग्न मोडलं. मला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यानंतर मी दुसऱया रिलेशनशिपमध्ये होते. त्यावरुनही मला ट्रोल करण्यात आलं. ट्रोलर्सनी मला म्हातारी, घटस्फोटीत, नवीन प्रियकर मला सोडून देईल असं म्हटलं होतं. काही ट्रोलर्सनी तिच्या मुलीलाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.माझी मुलगी माझं आयुष्य आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही भुंकू शकता. मला त्याची पर्वा नाही. पण तुम्ही माझ्या मुलीबद्दल काही बोलणार असाल, तर मी तुमचा गळा चिरीन अशी संतप्त भावना काम्याने ट्रोलिंगवर व्यक्त केली.