मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांची प्रतिक्रीया
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
कोविड 19 च्या प्रभावामुळे जगभरातील जवळपास सर्वच देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्येच सर्व प्रकारच्या राहणीमानात मोठय़ा वेगाने बदल होण्यास सुरुवात झाली आहे. आता वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातून काम करण्याची पद्धत वेगाने उदयास आली आहे. तसेच आगामी दोन वर्षातील डिजिटल प्लॅटफार्ममधील क्रांती दोन महिन्यातच पहावयास मिळाली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
सर्वत्र घरातून काम करण्याचा पर्याय आपल्या कर्मचाऱयांसाठी उपलब्ध करुन देण्यावर ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी व टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या कर्मचाऱयांना अधिकाधिक कालावधीसाठी वर्क फ्रॉम होमची संकल्पना राबवण्याचा विचार करत आहेत. परंतु हा पर्याय आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे संकेत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी दिले आहेत.
आपल्यासमोर उपाय काय
कोविड 19च्या प्रभावाच्या कालावधीत उलट सुलट प्रकाराचा विचार करुन योग्य ती कामाची पद्धत म्हणून पाहताना अतिरिक्त कामांचा ताण कसा असणार?, मानसिक आरोग्य कोणत्या प्रकारे राहणार?, याच काळात समुदायाचे वातावरणाचे रुप व संपर्काची साधने काय राहणार? आणि यासोबतच आपल्याकडे असणाऱया साधनसामुग्रीचाही विचार करावा लागणार असून यावरच वर्क फ्रॉम होमची संकल्पना पूर्ण करण्याचा मार्ग शोधावा लागणार असल्याचे नडेला यांनी द न्यूयॉर्क टाईम्ससोबत चर्चा करताना स्पष्ट केले आहे.