प्रतिनिधी/ पणजी
कायसुव येथील श्री स्वामी अच्युतानंद महाराज यांची 82 वी पूण्यतिथी रविवार दि. 4 एप्रिल ते मंगळवार दि. 13 एप्रिल रोजी पर्यंत साजरा होणार आहे.
त्यानिमित्त रविवार दि. 4 रोजी स. 7 वा. श्री स्वामी अच्युतानंद महाराजांच्या तसबिरीची पालखीतून सांगले येथील न्यू लक्ष्मी बॅण्ड हरीपूर बॅन्जो पार्टी सिंगर सहीत गावातून भव्य मिरवणुक. (बॅण्ड अशोक श्रीधर परोब तेर्फ पुरस्कृत). सोमवा दि. 5 री स्वामीजींची पूण्यतिथी साजरी होणार आहे. त्यानिमित्त सकाळी स्वामीजींच्या मूर्तीवर महाअभिषेक, राजोपचार पूजा, लघुरुद्र, आरती तसेच दुपारी 2 वा. फळाफुलांची पावणी केली जाईल. तद्नंतर संध्या. 4 वा. समराधना व रात्रो भजनाचा कार्यक्रम.
मंगळवार दि. 6 रोजी रा. 7 वा. वयोगट 17 वर्षांवरील बार्देश तालुका मर्यादित ‘नाटय़गीत गायन स्पर्धा’ बुधवार दि. 7 रोजी सायं. 7 वा. ‘भजनाचा कार्यक्रम’ यात नारायण मांद्रेकर, समीर शिरोडकर, संतोष मांद्रेकर इतर भाग घेतील.
गुरुवार दि. 8 रोजी शिशिरोत्सवानिमित्त रा. 7 वा. दाभोलवाडेकरातर्फे ‘नाटक एका नाटकाचे’ हा दोन अंकी कोकणी नाटय़प्रयोग होणार आहे. शुक्रवार दि. 9 रोजी रा. 7 वा. हुडोवाडेकरातर्फे अश्रूंची झाली फुले’ हे तीन अंकी सामाजिक नाटक होणार आहे. शनिवार दि. 10 एप्रिल रोजी रा. 7 वा. वळकर-झरकर वाडेकरातर्फे ‘संगीत देवात्मा’ नाटक होणार आहे. रविवार दि. 11 एप्रिल रोजी रा. 7 वा. बंदीरवाडेकरातर्फे आगळें तूं वेगळें हांव’ हे कोकणी नाटक सादर होणार आह. सोमवार दि. 12 रोजी बादे वाडेकरातर्फे धुमशाण हे दोन अंकी नाटक होणार आहे. मंगळवार दि. 13 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजल्पासून धुलीवंदनाने कार्यक्रमाची सांगता.