ऑनलाईन टीम / कारगिल :
लडाखमधील कारगिलमध्ये आज पहाटे 3.37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. 4.7 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाचे केंद्र कारगिलच्या वायव्येकडे ४३३ किलोमीटर वर होते. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने यासंदर्भात माहिती दिली आहे.
यापूर्वी गुरुवारी दुपारी 1.11 वाजता कारगिलमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला.त्याचे केंद्र कारगिलच्या वायव्येला 119 कि.मी होते. लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही वेळातच जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2.20 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी होती. 1 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमध्ये एकाच दिवसात दोनदा तीव्र भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र किश्तवार होते.