शेरशाह चित्रपट 2 जुलैला प्रदर्शित होणार
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. हा चित्रपट कारगिल युद्धाचे नायक राहिलेले परमवीर चक्र विजेते हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर बेतलेला आहे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे हा चित्रपट रखडला होता. पण आता याच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मोठय़ा पडद्यावर कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी सादर करण्याची पूर्ण तयारी असल्याचे उद्गार सिद्धार्थने चित्रपटाचे 2 नवे पोस्टर्स सादर करताना काढले आहेत. चित्रपटात सिद्धार्थ हा कॅप्टन विक्रम बत्रा तर कियारा आडवाणी विक्रम यांची वाग्दत्त वधू डिंपल चीमा यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांची जोडी एकत्र पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. दोघेही परस्परांच्या प्रेमात असल्याची चर्चा दीर्घकाळापासून रंगली आहे.
सिद्धार्थ याचबरोबर ‘मिशन मजनू’ चित्रपटात रश्मिका मंदानासोबत दिसून येणार आहे. याचबरोबर त्याने ‘थँक गॉड’ चित्रपटात काम करण्यास होकार दर्शविला आहे. कियारा सध्या कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया’ आणि वरुण धवन साब्sात ‘जुग जुग जियो’मध्ये काम करत आहे.