केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांची माहिती
नवी दिल्ली
दीर्घ काळापासून लांबणीवर पडलेले स्क्रॅपेज पॉलिसी लवकरच लागू केली जाऊ शकते. सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली आहे. शनिवारी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीसाठी कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात यासंबंधी माहिती दिली आहे.
स्क्रॅपेज पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे घसरणीचा सामना करत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. नवीन वाहनांची मागणी वाढल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला वेग येईल. ग्राहकांना 30 टक्के स्वस्त नवीन वाहने मिळतील. जुन्या वाहनांमुळे 25 टक्के वायू प्रदूषण कमी होईल. तसेच भंगार केंद्रावर मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा दावा करण्यात येत आहे.
नवीन कारची नोंदणी विनामूल्य
जुन्या कारला स्क्रॅपेज केंद्रावर विक्री केल्यावर एक प्रमाणपत्र देण्यात येईल. ते दाखवून नवीन कार खरेदी करणाऱयांना कारनोंदणी विनामूल्य केली जाईल.