रस्ता ओलांडताना गांधीनगरजवळ अपघात
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव कारच्या ठोकरीने पादचारी तरुण जागीच ठार झाला. सोमवारी सायंकाळी पुणे, बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगरजवळ ही घटना घडली आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
योगेश बाळकृष्ण मोरे (वय 27, रा. बसुर्ते) असे त्याचे नाव आहे. योगेश पेंटर काम करत होता. गांधीनगर येथे त्यांचे नातेवाईक राहतात. सोमवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास उड्डाणपूलाजवळ रस्ता ओलांडताना भरधाव कारची धडक बसून तो जागीच ठार झाला.
अपघातानंतर कारचालकाने आपल्या वाहनासह पलायन केले आहे. वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक नंदिश कुंभार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणी करून या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तवेरा कारने या तरुणाला धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून तरुणाचा बळी घेणाऱया कारचालकाचा शोध घेण्यात येत आहे..