ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू कुशल मेंडिस याच्या कारच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोलंबो शहरातील पंदौरा येथे हा अपघात झाला. याप्रकरणी मेंडिसला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत वृद्ध पंदौरा येथील रहिवाशी होता. तो सायकलवरून जात असताना मेंडिसच्या कारने त्याला जोरदार धडक दिली. कारच्या धडकेत 64 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार मेंडिस स्वतः चालवत होता.
मेंडसला 48 तासांच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले जाणार आहे. मेंडिसची एसयूव्ही कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 25 वर्षीय मेंडिसने श्रीलंकेसाठी 44 कसोटी तर 76 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो संघाचा विकेटकिपर आहे.