रस्तेसुरक्षेसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रस्तेसुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यांवर धावणाऱया प्रत्येक कारमध्ये प्रवाशाला अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यानी ट्विटरवर याची माहिती दिली आहे.
कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करणाऱया अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. यामुळे सर्व प्रकारच्या कासंमध्ये प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकेल. कारची किंमत आणि व्हेरियंटचे याच्याशी कुठलेच देणेघेणे नसेल असे गडकरी यांनी म्हटले आहे.
हा निर्णय एम1 शेणीतील कार्ससाठी घेण्यात आला आहे. एम1 श्रेणीत 5-8 आसनी कार्सचा समावेश होतो. अशाप्रकारे आता मिड-रेंजच्या सर्व कार्समध्ये 6 एअरबॅग अनिवार्य असतील. या नव्या निर्णयानंतर कारमध्ये दोन साइड एअरबॅग आणि दोन साइड कर्टेन देखील असतील, ज्यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशाची सुरक्षाही सुनिश्चित केली जाऊ शकेल. सरकारने यापूर्वीच चालकाच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य केली होती. यंदा 1 जानेवारी 202 पासून सर्व कार्समध्ये चालकांसह सहप्रवाशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कारमध्ये दोन एअरबॅग अनिवार्य करण्यात आले होते.
सरकारच्या नव्या निर्णयानंतर निश्चितपणे कार कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. एका एअरबॅगची किंमत 1800-200 रुपयांदरम्यान असते. अशा स्थितीत 6 एअरबॅग बसविण्याचा एकूण खर्च 10-12 हजार रुपयांदरम्यान असू शकतो. एअरबॅगची मागणी वाढल्यास याचा निर्मितीखर्च खाली येणार असल्याचा सरकारचा अनुमान आहे. रस्ते दुर्घटनेत जीव गमाविणाऱयांप्रकरणी भारत जगात पहिल्या स्थानावर आहे. बळींचा हा आकडा कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नवा निर्णय सरकारच्या याच प्रयत्नांचा एक भाग असू शकतो.