113 जण कोरोनामुक्त : एकाचा मृत्यू, जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 1276
प्रतिनिधी / कारवार
कारवार जिल्हय़ात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांनी दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. जिल्हय़ात 201 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 113 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कारवार तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ामध्ये कारवार तालुक्यात 44, मुंदगोड 29, शिरसी 19, यल्लापूर 17, कुमठा 14, सिद्धापूर 11, अंकोला आणि जोयडा प्रत्येकी 7, होन्नावर 4 आणि भटकळ तालुक्यात दोन बाधितांचा समावेश आहे.
113 बाधितांची कोरोनावर मात
जिल्हय़ात मंगळवारी 113 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शिरसीतील 30, कारवार 22, हल्याळ 20, सिद्धापूर 11, कुमठा 9, अंकोला 7, होन्नावर 5, मुंदगोड 4, भटकळ आणि जोयडा प्रत्येकी दोन आणि यल्लापूर तालुक्यातील एक कोरोनामुक्त बाधितांचा समावेश आहे.
जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 1276
जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,276 झाली आहे. यापैकी 182 बाधितांवर जिल्हय़ात विविध इस्पितळात तर 94 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. आजअखेर जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 17,653 इतकी झाली आहे. यापैकी 16,168 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्हय़ात आजअखेर 209 बाधित दगावले आहेत.
कारवार तालुक्याची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने?
दरम्यान, कारवार तालुक्याची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने तर होत नाही ना? असा संशय होत आहे. कारण गेल्या 19 एप्रिलपासून आजअखेर जिल्हय़ात 1 हजार 324 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये कारवार तालुक्यातील बाधितांची संख्या 374 इतकी आहे. एका दिवशी तर कारवार तालुक्यातील बाधितांची संख्या 100 च्या आसपास पोहोचली होती. कोरोना महामारीच्या लाटेअंतर्गत जिल्हय़ातील भटकळ, शिरसी, मुंदगोड, आणि हल्याळ तालुक्यातील (दांडेली सहित) बाधितांची संख्या लक्षणीय होती. तथापि, दुसऱया लाटेअंतर्गत कारवार तालुक्याने जिल्हय़ातील सर्व तालुक्यांना पाठीमागे टाकले आहे.
तालुक्यातील समस्या गंभीर कारवार तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 2917 इतकी झाली आहे. यापैकी सक्रिय बाधितांची संख्या 348 आहे. यापैकी 32 बाधितांवर रुग्णालयात तर 316 जणांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. परराज्यातील आणि अन्य जिल्हय़ातील नागरिकांमुळे कारवार तालुक्यातील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे सांगण्यात आले.