जिल्हाधिकारी मलै मुगीलन यांची माहिती : ग्रामीण भागात घरोघरी तपासणी
प्रतिनिधी / कारवार
कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जिल्हय़ात 23 रुग्णालये निश्चित केली आहेत. या रुग्णालयातील 1,351 बेड्स कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. राखीव बेड्सपैकी 811 बेड्सना ऑक्सिजनची सोय केली आहे. या व्यतिरिक्त जिल्हय़ात 16 कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. या सेंटरमध्ये 1,030 रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मलै मुगीलन यांनी दिली. ते आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत
होते.
केंद्रीकृत बेड मॅनेजमेंट व्यवस्थेअंतर्गत कोविड रुग्णांसाठी बेड्स आरक्षित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आशा कार्यकर्त्या आणि ज्युनिअर महिला आरोग्य साहाय्यिकांचा समावेश असलेल्या पथकांची रचना करण्यात आली आहे. ही पथके जिल्हय़ातील ग्रामीण भागातील घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. कोविडची लक्षणे दिसून येणाऱया वयोवृद्ध आणि अन्य आजारांनी पीडित असलेल्या नागरिकांचे रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे कोविडची लागण झाली आहे काय, हे पाहणार आहेत. या पथकांनी भेट दिली असतान नागरिकांनी त्यांच्याशी सहकार्य करावे आणि आपल्या आरोग्याबद्दल काही एक लपवून ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले.
अधिक बाधित असलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन
याप्रसंगी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रकाश देवराजू म्हणाले, ज्याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, अशा परिसराचीच मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषणा केली आहे. तेथील नागरिकांनी घराबाहेर न पडू नये. कुणावरही लाठी उगारण्याचा किंवा लाठीचा प्रसाद न देण्याची सूचना पोलीस कर्मचाऱयांना देण्यात आली आहे. तथापि गरज नसताना रस्त्यावर फिरणाऱयांची वाहने जप्त केली जातील आणि दंड वसूल केला जाईल, असे पुढे त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. कृष्णमूर्ती, प्रोबेशनरी आय. ए. एस. अधिकारी अविनाश शिंदे उपस्थित होते.