बेंगळूर : बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात असलेल्या तामिळनाडूतील एआयएडीएमके पक्षाच्या नेत्या शशिकला नटराजन यांनी आपली सद्वर्तणुकीच्या आधारावर मुदतीपूर्वी सुटका करावी, अशी विनंती केली आहे. यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. तामिळनाडूच्या दिवंतग मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असणाऱया शशिकला नटराजन यांना बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी 2014 मध्ये 10 कोटी रुपये दंड आणि कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात नातेवाईकांमार्फत डीडीद्वारे दंडाची रक्कम भरली आहे. चार वर्षांच्या कारावासानंतर त्यांची 27 जानेवारी 2021 रोजी सुटका होण्याची शक्यता आहे. परंतु, त्यांनी आपली चांगल्या वर्तणुकीच्या आधारे मुदतीपर्वी सुटका करावी, अशी विनंतीचे पत्र कारागृह अधीक्षकांकडे पाठविले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवर शशिकला यांची सुटका अवलंबून आहे.
Previous Articleएमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन
Next Article तातडीने शाळा सुरू करा!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.