काल रात्री झाली संयुक्त बैठक : यापूर्वी दिला होता मगोला पाठिंबा
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील कारापूर कुडणे या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अजय नाईक यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. बुध. दि. 9 रोजी रात्री तशी एक संयुक्त बैठक विठ्ठलापूर भागात होऊन काँग्रेस पक्षाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार अजय नाईक यांना देण्याचे ठरविण्यात आले. अशी माहिती हाती आली आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा या मतदारसंघातील मगोचे उमेदवार योगेश पेडणेकर यांना देण्यात आला होता. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्र पालटणार असल्याचे दिसून येत आहे.
मगो आणि काँग्रेस यांच्यात निवडणूकीवरून बिनसल्याने काँग्रेसतर्फे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यापूर्वी काँग्रेस पक्षाचा कारापूर कुडणे मतदारसंघात पाठिंबा मगोचे उमेदवार योगेश पेडणेकर यांना होता.मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांना वाठादेव सर्वण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना तसे सांगितले होते. मगोचे उमेदवार रिंगणात नाहीत त्या मतदारसंघात मगोचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा असल्याने त्यांनी जाहीर केले होते. मात्र गेल्या काहीच दिवसांपूर्वी याच निवडणुकीवरून यि दोन्ही पक्षांमध्ये बिनसल्याने आता काँग्रेस पक्षाने आपला मगोला असलेला पाठिंबा काढत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची कृती सुरू केली आहे.
विठ्ठलापूर साखळी येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात झालेल्या बैठकीला अपक्ष उमेदवार अजय नाईक यांच्यासह युवानेते अजय प्रभुगावकर, धीरज सावंत, शैलेश फातर्फेकर, मये काँग्रेस गटाध्यक्ष संदीप नाईक, दिलीप गावस व इतरांची उपस्थिती होती. कारापूर कुडणे मतदार संघात अजय नाईक यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे काम कशा पध्दतीने व्हावे, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अजय नाईक हे एक समाजसेवी व्यक्तीमत्व असून मये मतदारसंघातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला भेदून अपक्षपणे रिंगणात उतरले आहे. त्यां?ना पिळगाव पंचायत क्षेत्रातील लोकांबरोबरच युवा वर्गाचा पूर्ण पाठिंबा आहे. या मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या प्रचारकार्यात बेरोजगार युवक युवतींची यादी तयार करून त्यांना भविष्यात रोजगार मिळवून देण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. आज विविध आमिषांना बळी पडून मते मारून नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या काम करणाऱया उमेदवाराचा स्विकार मतदारांनी करावा, असे आवाहन अजय प्रभुगावर यांनी केले आहे.