अखेरच्या दिवशी 2 अर्ज सादर. आज छाननी. उद्या मागे घेण्यासाठी मुदत.
डिचोली/प्रतिनिधी
कारापूर सर्वण पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 साठी होणाऱया पोटनिवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी दि. 8 एप्रिल रोजी आणखी 2 अर्ज निवडणूक अधिकारी मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यामुळे एकूण 5 अर्ज या प्रभागासाठी दाखल झालेले आहेत. आज शुक्र. दि. 9 एप्रिल रोजी या अर्जांची छाननी होणार आहे.
या प्रभागासाठी काल गुरुवारी अजस खान व प्रेमानंद सावंत यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. यापूर्वी या प्रभागातून शिवानंद बापे, राजेश नाईक, सिध्देश तारी यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. गुरुवारी दि. 8 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज सादर झाले. त्यामुळे उमेदवारी अर्जांची संख्या 5 झाली आहे.
आज शुक्रवारी (दि. 9) सकाळी मामलेदार कार्यालयात या अर्जांची छाननी होणार असून उद्या शनिवारी दि. 10 रोजी सकाळी 10 ते दु. 2 यावेळेत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी उमेदवारांना निवडणूक चिन्हे बहाल केली जाणार आहेत. 23 एप्रिल रोजी मतदान होणार तर 26 रोजी मतमोजणी होणार आहे.