बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मंत्री हेब्बार यांनी आपण स्वतः आणि पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हंटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आणि त्याची पत्नी दोघेही घरी उपचार घेत असल्याचे सांगितले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर यांनी हेब्बार लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. सुधाकर यांनी मला खात्री आहे की तो लवकरच बरे होतील आणि आपली जबाबदारी पार पाडतील असं म्हंटल आहे.