वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका षटकात सहा षटकार ठोकणारा न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टर हा जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सुपर स्मॅश टी-20 राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात कॅटरबेरी किंग्ज संघाकडून खेळणाऱया 25 वर्षीय डावखुरा लिओ कार्टरने नॉर्दन नाईटस् संघातील फिरकी गोलंदाज डेव्हिच याच्या एका षटकात सहा षटकार ठोकले. कार्टरने 29 चेंडूत नाबाद 70 धावा झोडपल्याने कॅटरबेरी किंग्जने हा सामना 7 गडय़ांनी जिंकला.
क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सहा षटकार मारणाऱया फलंदाजांच्या यादीत यापूर्वी विंडीजचे सर गॅरी सोबर्स, भारताचे रवि शास्त्राr, युवराज सिंग, दक्षिण आफ्रिकेचे हर्षल गिब्ज तसेच इंग्लंडचे रॉस व्हिटेली आणि अफगाणचा झेझाई यांचा समावेश आहे.