ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील NCB चा पंच प्रभाकर साईलचे शुक्रवारी दुपारी चेंबूरमधील राहत्या घरी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साईलचे वकील तुषार खंदारे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. किरण गोसावींकडेच याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होती. साईल याने NCB चे तत्कालीन विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोपही साईलकडून करण्यात आला होता.
साईलचा मृतदेह आज सकाळी 11 वाजता अंधेरी येथील त्याच्या घरी आणला जाईल. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.