साताऱयातील एकाला ऑनलाईन गंडा
प्रतिनिधी/ सातारा
बँकीग व्यवहार ऑनलाईन झाल्यापासून बँकेच्या खात्यातून चोरी करणाऱया सायबर चोरांची संख्या वाढली असून त्याचा फटका अनेकांना बसला असताना देखील अशा भामटय़ांच्या बळी पडण्याचे प्रमाण देखील मोठे आहे. असाच प्रकार साताऱयातील एकाला अनुभवावा लागला असून त्याला एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डाचे लिमिट वाढवून देण्याचे अमिष दाखवून त्याच्या बँकेच्या खात्यावरुन तब्बल 1 लाख 79 हजार 320 रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत गिरीश ओंकारेश्वर सावगावे वय 40, रा. रामाचा गोट, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली महिती अशी, दि. 4 ऑक्टोबर रोजी सावगावे हे त्यांच्या वडिलांना दवाखान्यात घेवून जाण्याच्या गडबडीत असताना त्यांना 1408393843 या क्रमांकावरुन त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. समोरील अनोळखी व्यक्तींने एसबीआय बँकेतून गुप्ता बोलत असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिट कार्ड व बँकेच्या क्रमाकांची नावासह माहिती देत क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याची माहिती दिली.
मात्र, सावगावे गडबडीत असल्याने त्यांनी नंतर पाहू असे सांगत त्याला टाळले मात्र नंतर अनोळखीने तुमची लिंक मी ओपन करतो तुम्हाला ओटीपी येईल तेवढा सांगा. तुमचे कार्ड लिमिट आठ दिवसात वाढवून येईल असे सांगितले. तो प्रसंग सावगावे विसरुनही गेले. दि. 9 रोजी त्यांना एसबीआय बँकेतून फोन आला की त्यांच्या खात्यावरील 1 लाख 79 हजार 320 रुपये कपात झाले आहेत. त्यावेळी सावगावे यांनी बँकेत जावून हे पैसे चुकीच्या पध्दतीने खात्यातून गेले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
बँकेने त्यांना इमेल पाठवून डिस्पुटेड ट्राझेंक्शन झाल्याचा सांगितल्यावर सावगावे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अनोळखी क्रमांकावरुन बोलणाऱया गुप्ता विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दिली असून या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पतंगे करत आहेत.