अभिनेता कार्तिक आर्यनच्या एका चाहतीनं चक्क त्याला 20 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. ही ऑफर देत तिनं अभिनेत्याकडं अनोखी मागणी केली आहे. कार्तिक हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. कार्तिकचं एकूण व्यक्तिमत्त्व चाहत्यांना विशेष करून तरुणींना भुरळ पाडणारं असं आहे. त्यामुळेच कार्तिक लाखो तरुणींचा आवडता आहे. आपल्या लाडक्या कलाकारासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. असाच अनुभव कार्तिकला देखील आला आहे.
कार्तिक आर्यनच्या एका चाहतीनं चक्क त्याला लग्नाची मागणी घातली, इतकंच नाही तर त्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांची ऑफरही दिली आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या एका व्हिडिओवर चाहतीनं ही मागणी केली आहे. कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक त्याच्या चिमुरडी चाहती इयात वर्मा हिच्याशी बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कार्तिकनं लिहिलं आहे की, ‘क्युटेस्ट अर्जुन पाठक…’ कार्तिकनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर युझर्सनी भरभरून कॉमेन्ट करायला सुरुवात केली आहे. एका महिला चाहतीनं कमेन्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर त्याच्या महिला चाहतीनं थेट त्याला लग्नाचीच मागणी घातली आहे.
कार्तिकनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिनं लिहिलं की, माझ्याशी लग्न कर. मी तुला 20 कोटी रुपये देईन. या महिला चाहतीनं केलेल्या कमेन्टवर कार्तिकनं देखील लगेचच उत्तर दिलं आहे. त्यानं खूप साऱया इमोजी शेअर करत ‘कधी?’ असा प्रश्न विचारला आहे.
Previous Articleहॅलेप, स्वायटेक उपांत्य फेरीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.