बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या 20 वर्षांपासून नावारुपाला आलेल्या कार्तिका सारीज या दुकानाने बेळगावात आपली एक वेगळीच छटा उमटविली आहे. लग्न समारंभांसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे सर्व नागरिक या दुकानातूनच खरेदी करत असतात. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांतील नागरिक खरेदीसाठी गणपती गल्ली येथील कार्तिका सारीजमध्ये गर्दी करतात, हे पाहायला मिळते.
महिलांचा सर्वात आवडता छंद हा कपडे खरेदीचा. त्यात त्यांना नवनवीन व्हरायटी व रंग मिळाले तर विचारायलाच नको. महिलांच्या आवडीचा विचार करून कार्तिका सारीज यांनी मारुती गल्ली येथे आपली नवीन शाखा उभारली आहे. या शाखेचे नाव कार्तिका सिल्क असे आहे.
खरेदीवर आकर्षक डिस्काउंट
1 नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या या नव्या शाखेचे उद्घाटन केले आहे. या ठिकाणी लग्न समारंभ, अहेर, पार्टी वेअर यासारख्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळय़ा किमतीत वेगवेगळय़ा व्हरायटी उपलब्ध आहेत. दोनशे रुपयांपासून ते अगदी हजारो रुपयापर्यंतच्या घरात प्युअर सिल्क साडय़ा उपलब्ध आहेत. तसेच नवीन शाखेचा नुकताच शुभारंभ करण्यात आल्यामुळे ग्राहकांनी केलेल्या खरेदीवर आकर्षक डिस्काउंटही देण्यात येत आहे.
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद -आय. के. वेंकटेश
नुकताच नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या ठिकाणी महिलांसाठी साडय़ांमध्ये नवनवीन व्हरायटी उपलब्ध आहेत. तसेच कांजीवरम, धर्मावरम, सिल्क कॉटन, घागरा, चुडीदार सेट यासह अनेक कपडे उपलब्ध आहेत. तसेच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांनी केलेल्या खरेदीवर डिस्काउंटही देण्यात येत आहे. गणपत गल्ली येथील मुख्य शाखेप्रमाणेच या नवीन शाखेतही ग्राहकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होत आहे.