प्रतिनिधी/ बेळगाव
कार्तिकी एकादशीनिमित्त वडगाव बाजार गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भजन, कीर्तन, हरिपाठाचे वाचन करण्यात आले. दर्शन तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी वारकरी व भाविकांनी गर्दी केली होती.
कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. परंतु यावषी कोरोना महामारीमुळे त्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जाता आले नाही. त्यामुळे आपल्या परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जावून भाविकांनी दर्शन घेतले. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वडगावच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती. मंदिरात आकर्षक अशी आरास करण्यात आली होती.