अभिनेता कार्तिक आर्यनने स्वतःच्या चित्रपट कारकीर्दीत कमी कालावधीत चांगलेच नाव कमावले आहे. कॉमिक टायमिंगप्रकरणी अनेक मोठय़ा कलाकारांना मागे टाकणारा कार्तिक आता गंभीर आणि वेगळय़ा धाटणीच्या भूमिका करताना दिसून येत आहे. कार्तिक आता मोठय़ा पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारणार आहे. त्याने या विशेष प्रकल्पासाठी करण जौहरसोबत हातमिळवणी केली आहे.
कार्तिक आता गुंजन सक्सेना फेम दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. हा चित्रपट बायोपिक नसून क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत मनोरंजक स्वरुप देण्याची तयारी आहे. चित्रपटासाठी कार्तिकला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या चित्रपटाची अद्याप औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
कार्तिकच्या या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीचा शोध घेतला जात आहे. निर्मात्यांनी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींशी संपर्क साधल्याचे समजते. कार्तिकने आतापर्यंत जवळपास सर्वच नव्या नायिकांसोबत काम केले आहे.