प्रतिनिधी/ बेळगाव
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर येथे रविवारी त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रानिमित्त कार्तिक स्वामी दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12.47 वा. मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.
मंदिर खुले केल्यानंतर महामस्तकाभिषेक व मंगलारती करण्यात आली. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, संचालक अभिजित चव्हाण, राकेश कलघटगी, राहुल कुरणे, विवेक पाटील, राजू भातकांडे, अविनाश खन्नुकर, अनिल मुतकेकर, प्रसाद बाचुळकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी मंदिर ट्रस्टतर्फे घेण्यात आली होती.
सोमवार दि. 30 रोजी दुपारी 2.59 वा. कार्तिक स्वामी मंदिर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी त्यापूर्वी दर्शन घ्यावे, असे आवाहन कपिलेश्वर महादेव विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.