प्रतिनिधी / पणजी
राजधानीत शनिवार 13 रोजी कार्निव्हल मिरवणूक होणार असल्याने वाहतूक वेवस्थेत बदल करण्यात आले आहे. वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वाहतूक पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
कार्निव्ह मिरवणूकीला 13 रोजी दुपारी 3 वाजल्या पासून जुन्या सचिवालयाकडून प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून दिवजा सर्कल येथे मिरवणूकीत सहभागी होणारे चित्ररथ जमा होतील. त्यासाठी ओल्ड गोवा रायबंदर या ठिकाणाहून पणजीत येणारी वाहने रायबंदर पाटो जेक्शन, चिंबल जेंक्शन मेरशी सर्कलहून पुढे सोडली जातील. तसेच पणजीहून ओल्ड गोवा रायबंदर येथे जाणाऱया वाहनांसाठी केटीसी सर्कल, मेरशी सर्कल रायबंदर मेरशी जेक्शन हून पुढे सोडण्यात येतील.
पणजी शेहरात येणाऱया वाहनांसाठी वाहनांना कोकणी अकादमीकडून जुना पाटो पुल मार्गे चर्च चौकातून पुढे सोडण्यात येईल. मांडवी पुलावरून तसेच बांबोळी बाजूने येणाऱया वाहनांना दिवजा सर्कल कडून येणारा मार्ग बंद करण्यात येणार असून त्यांना थेट कोकणी अकादमीकडून जुन्हा पाटो पुलावरून शहरात प्रवेश करता येईल. मिरवणूकीला सुरुवात झाल्यानंतर सीटी बस बंद केले जातील.
मिरामार भागातून येणारी वाहने कंपाल गणेश जेक्शन येथे वळून अग्निशामक जेक्शन, सांतइनेझ जेक्शन, काकुलो आयलँड, एमजी रस्ता, 18 जून रस्ता मार्गे पुढे नवीन पाटो पुल मार्गाहून पुढे जातील. मिरवणूकी दरम्याने मालवाहक ट्रकना शहरात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. मिरणूकीला येणाऱयांसाठी वाहन पार्कींग व्यवस्था करण्यात आली असून उत्तर भागातून येणाऱया वाहन चालकांनी इडीसी प्लाझा केटीसी बसस्थानकाजवळ वाहने पार्क करावी तर दक्षिण भागातून येणाऱया वाहनचालकांनी जीएमसी, गोवा विद्यापीठ मार्गे येऊन कंपाल परेड मैदानावर वाहन पार्कींग करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मिरवणूकी दरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.