प्रतिनिधी /बेळगाव
बिम्स येथे 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोविड-19 लसीकरण कार्यक्रमांतर्गत कार्बोव्हॅक्स लस देण्याला बुधवारी प्रारंभ झाला. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यात आला. कर्नाटक सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान सुरू झाले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, 16 मार्च 1995 रोजी पहिला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 2014 मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. आता 12 ते 14 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असून राज्यातील 6 जिह्यांपैकी बेळगाव त्यापैकी एक आहे, हे महत्त्वाचे होय.
याप्रसंगी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, लसीकरण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, बिम्सचे अधीक्षक डॉ. आण्णासाहेब पाटील, मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ उपस्थित होते.