नाटक, भजन, कीर्तनासह भरगच्च कार्यक्रम
प्रतिनिधी /तिसवाडी
मेरशी कार्मीभाट, येथील श्री देवी सातेरी देवीचा 8 वा वर्धापनदि व 61 वा जत्रौत्सव सोहळा 10 मार्च ते 16 मार्च 2022 पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
गुरूवार 10 मार्च रोजी सकाळी 8.30 वा. सौ. व श्री. संतोष भिकारो बोरकर यांच्या यजमानपदाने नितीन भट यांच्या पौरहित्याखाली लघुरूद्र, महाभिषेक, गंधपूजा तद्नंतर दुर्गाहवन, आरती, सामुदायिक गाऱहाणे, तीर्थप्रसाद व महानैवेद्य होईल. संध्या. 6.30 वा. ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. गुरूदासबुवा सुतार यांचे सुश्राव्य किर्तन होईल. तद्नंतर सुवासिनींच्या जोडवी, आरतीसह श्रींची पालखीतून देऊळ प्रदक्षणा, आरती व तीर्थप्रसाद होईल.
शुक्रवार 11 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वा. श्री देवीची छत्री व पान मंदिरातून वाजत गाजत नाटय़मंडपात आश्रयीन करण्यात येईल. शनिवार 12 मार्च रोजी सकाळी 9 वा. धार्मिक विधी, अभिषेक व तद्नंतर दुपारी 1 वा. आरती व तीर्थप्रसाद. संध्याकाळी 4 वा. श्री सातेरी देवीची पालखीतून बँड व शिवगर्जना लेझीम पथकासह मेरशी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल.
रविवार 13 मार्च रोजी रात्री 8.30 वा. फळांची पावणी व रात्री 10 वा. आदिमाया क्रियेशन पणजी निर्मित आणि किशोर नार्वेकर आणि देवानंद नाईक पुरस्कृत नाटक ‘आपा लिपा’ नाटक सादर करण्यात येईल. सोमवार 14 मार्च रोजी रात्री 8.30 वा. फळांची पावणी व रात्री 10 वा. श्री साईबाबा मंदिर, कार्मीभाट मेरशीतर्फे संतोष भिकारो बोरकर यांच्यातर्फे ‘आत्या आत्या सून कर’ नाटक सादर करण्यात येईल.
मंगळवार 15 मार्च रोजी रात्री 8.30 वा. फळांची पावणी व रात्री 10 वा. हेमंत गोलतकर निर्मित दोन अंकी कॉमेडी नाटक ‘हांव भगवंताचो अवतार.’ हे राजू भिकारो नाईक व जयेंद्रनाथ हळणदकर दिग्दर्शित नाटक सादर करण्यात येईल.
बुधवार 16 मार्च रोजी गुलालोत्सव, संध्या. 7 वा. फळावळ व इतर वस्तूंची पावणी. तद्नंतर सामुदायिक गाऱहाणे. गुलालोत्सव व श्रींचा कौल सर्वांना वाटून उत्सवाची सांगता करण्यात येईल. असे श्री सातेरी देवी ग्रामदेवता देवस्थान समिती कार्मीभाट, मेरशी यांनी कळविले आहे.