भारतीय दांपत्याचे अनोखे राहणीमान
कोरोना आणि लॉकडाउनने लोकांना आता जग खबरदारी घेतच चालणार असल्याचे कळून चुकले आहे. अशा स्थितीत स्वतःच्या जीवनात कोणते बदल घडवायचे हे स्वतःच ठरवावे लागणार आहे. काही लोक घरांमध्येच राहिले, तर काही जण बाहेरील जग अनुभवयाला निघाले. कार्तिक वासन आणि स्मृती भदोरिया हे भारतीय दांपत्य कॅनडाच्या टोरंटोमध्ये वास्तव्यास आहे. पण प्रवास आवडत असल्याने दोघेही दीर्घ प्रवासावर बाहेर पडले आहेत.
या दांपत्याने 2020 मध्ये एक निर्णय घेतला. सर्वप्रथम त्यांनी स्वतःचे आरामदायी जीवन त्यागले, म्हणजेच त्यांनी स्वतःचा फ्लॅट सोडून त्यांनी एक कैराव्हॅन खरेदी केली.
10 देश फिरण्याची योजना
दोघेही दीर्घकाळापासून फिरस्त्याप्रमाणे जीवन जगू इच्छित होते. पण लॉकडाउननंतर त्यांना निर्णय घेणे सोपे ठरले. कॅनडा, अमेरिका आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसह एकूण 10 देशांमध्ये फिरण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
44 वर्षे जुनी व्हॅन
या दांपत्याने सर्वप्रथम एक व्हिंटेज व्हॅन तयार केली. ही व्हॅन 44 वर्षे जुनी होती. प्रारंभी ती 50 टक्केच काम करत होती. पण दांपत्याने यावर काम करत त्यात सुधारणा घडवून आणली. यात त्यांनी एक बेडही बसविला आहे. एक मोठे किचन देखील यात आहे.
नोकरी सुरूच
दांपत्या याव्यतिरिक्त काहीच करत नसल्याचा विचार करु नका. दोघेही नोकरु करतात. दुर्गम भागात हिंडून दोघेही काम करत आहेत. कार्तिक आयटीमध्ये काम करतो. तर स्मृती डिजिटल मार्केटींगमध्ये काम करत आहे. दोघेही सकाळी 6 वाजता काम सुरू करत दुपारी 2 वाजेपर्यंत संपवतात. याबद्दल त्यांच्या वरिष्ठांची कुठलीच तक्रार नाही. कामानंतर दोघेही मनसोक्त हिंडतात. हायकिंग करतात, सूर्यास्ताचा आनंद घेतात.
प्रतिदिन जणू वीकेंडच
कार्यालयीन काम दोघेही पूर्ण करत आहोत. त्यानंतर मनसोक्त हिंडत असल्याने प्रत्येक दिवस वीकेंडच वाटतो. लॅपटॉप बंद होताच एक नवे जग सुरू होते. स्वतःचा प्रवास कुठे संपुष्टात आणावा याचा विचार केला नसल्याचे कार्तिक सांगतो.