बेंगळूर : यंदा कार्यालयीन गाळय़ांच्या मागणीत जवळपास निम्म्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय स्थावरमालमत्ता सल्लागार फर्म सविल्स इंडिया यांनी याबाबतची माहिती स्पष्ट केली आहे. कार्यालयीन गाळय़ांची मागणी आघाडीवरच्या 6 शहरात 27.4 दशलक्ष चौ. फू. इतकी राहिली आहे. मागणीत जवळपास 51 टक्के इतकी घट झाल्याचे दिसून आली. मागच्या वर्षी 55.7 दशलक्ष चौ. फू. जागेची मागणी करण्यात आली होती. बेंगळूर शहराने सर्वाधिक कार्यालयीन गाळय़ांचा वापर करण्यात आघाडी घेतली आहे. 6.8 दशलक्ष चौ. फू. गाळय़ांसाठी जागेची मागणी करण्यात आली होती.
Previous Articleतिसऱया कसोटीसाठी भारतासमोर निवडीचा पेच
Next Article लक्झरी कार्सच्या विक्रीत घट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.