प्रतिनिधी/ बेळगाव
कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 3 वा. 45 मि. जेएनएमसीनजीक असलेल्या केएफसीसमोर घडली आहे. मृत तरूण हा काकतीचा असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून वाहतूक पोलिस अधिक तपास करीत आहेत.