अमेरिकेच्या काही प्रांतांमध्ये स्थिती आता नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. बाधितांसोबतच आता मृत्युमुखी पडणाऱयांचाही आकडा वाढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2.56 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 77 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नेवादा आणि मिशिगन यासारख्या प्रांतामध्ये स्थिती अधिकच बिकट आहे. नेवादाच्या रेनो शहराच्या रुग्णालायत रुग्ण वाढल्याने कार पार्किंगमध्ये वॉर्ड तयार करावा लागला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने कर्मचारी अपुरे पडत आहेत.
आम्ही नैराश्याच्या स्थितीत असून आमच्या अपेक्षा संपू लागल्या आहेत, स्थिती कधी सुधारणार हे सांगू शकत नाही. अशाप्रकारच्या स्थितीला तोंड द्यावे लागेल अशी कल्पनाही कधी केली नव्हती, असे उद्गार टेनेसीचे डायरेक्टर ऑफ क्रिटिकल केयर डॉक्टर एलिसन जॉन्सन यांनी काढले आहेत. तर इदाहोमध्ये डॉक्टरांनी सर्व रुग्णांना बेड पुरविणे अशक्य झाल्याचे म्हटले आहे.