प्रतिनिधी/ बेळगाव
समस्त दैवज्ञ ब्राह्मण समाजाची कुलदेवता श्री कालिका देवीचा वार्षिक उत्सव आणि पालखी सोहळा यंदा शुक्रवार दि. 1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी देवीला अभिषेक आणि पूजा करून ठीक 10 वाजता देवीची चांदीच्या पालखीमधून मिरवणूक काढण्यात येईल. जालगार गल्ली, खडक गल्लीमार्गे देवस्थानात आगमन होईल. त्यानंतर महाआरती करून तीर्थप्रसादाचे वितरण होणार आहे.
यंदा कोरोना संकटामुळे महाप्रसादाचे आयोजन होणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. यंदा देवीच्या गाभाऱयात नवीन टाईल्स बसविल्या असून संत्रोक्षण होमचे आयोजन केले आहे. सर्व बांधवांनी हजर राहून पालखी सेवा करावी आणि देवीचा कृपाशीर्वाद घ्यावा, असे देवस्थानतर्फे कळविण्यात आले आहे.